विविध क्षेत्रातील गुणवत्तेचा वापर शेतीमध्ये करावा

0

भुसावळ । संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात गीत गायनाने झाली. यानंतर ‘हम सब बेचैन है’ हे नाटक नवरत्न डहाके व विद्यार्थ्यांनी सादर केले. डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, बिल्डर, व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या गुणवत्तेचा वापर शेतीमध्ये करणे आज काळाची गरज आहे. सामजिक बाबींची पोस्ट करने म्हणजे सामाजिकता जोपासणे अशी भावना काढून टाका.

महिला सबलीकरणाचा संदेश
आज कालची सामाजिक परिस्थिती, नागरिकांची मानसिकता, राजकारणाची दशा व दिशा व त्याचा सामान्य जनतेवर होणारा परिणाम विद्यार्थ्यांनी अप्रतिमपणे सादर केला. प्रिया काळे व विद्यार्थ्यांनी ‘वुमन्स एम्पॉवरमेंट’ नाटकाअंतर्गत महिला सबलीकरण व सशक्तिकरण फार गरजेचे आहे असा संदेश दिला.

पर्यावरण जागृती
‘इंडियागिरी’ नाटकाद्वारे राज्य व्यवस्थेवर अवलबुंन नागरिकांच्या राहणीमानाचे स्तर तर ‘सेव ट्रीज सेव फ्यूचर’ या नाटकाच्या स्वरूपात पर्यावरण जनजागृतीचा प्रयत्न केला.

सहा एकांकिका सादर
स्नेहसंमेलनात गायन स्पर्धेत 24 स्पर्धकांनी गाणी सादर केली. त्यानंतर एकांकिका स्पर्धेत 6 एकांकिका सादर झाल्या. डॉ. बाबासाहेब टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी, लोनेरे, जिल्हा रायगडचे कुलगुरु डॉ. व्ही.जी.गायकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह उपस्थित असतील.