विविध क्षेत्रातील महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्कार

0

रावेत : चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळातर्फेे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात आले.

पुरस्कार्थी असे : लक्ष्मीबाई सातव (आदर्श माता), मीना भूमकर, माधवी भिडे, सरिता सोनवळे, कविता म्हेत्रे (समाज भूषण), श्रीमती मुक्ताबाई दर्शीले (वीर माता), योगिता चव्हाण (कला भूषण), अल्पना पालकर, सीमा जगताप, श्रीमती कल्पना गायकवाड, देविका शिंदे (आदर्श शिक्षिका), अनिता मगर (समाज भूषण), डॉ. छाया हेळंबे (जीवन गौरव), मधुरा कुलकर्णी ओतारी (कला भूषण), श्रीमती आरती शर्मा (क्रीडा भूषण), शबनम सय्यद (पत्रकार भूषण). सावित्रीबाई फुले स्मारकासाठी पाठपुरावा केल्याबद्दल मानव कांबळे यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगरसेविका अपर्णा डोके होत्या. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले. सुत्रसंचलन दत्तात्रय चव्हाण यांनी केले. आभार प्रिया साळुंके यांनी मानले.