विविध क्षेत्रात होणारी विद्यार्थ्यांची प्रगती अभिमानास्पद बाब

0

भुसावळ । शैक्षणिक क्षेत्रात ताप्ती एज्युकेशन सोसायटीने नावलौकिक मिळविले असून यात संस्थेच्या संपूर्ण यशात ज्याप्रमाणे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासन यांसह विद्यार्थ्यांचादेखील सिंंहाचा वाटा आहे आणि याठिकाणी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी दर्शविल्यामुळे त्यांना पुरस्कार वितरण केले जात असल्याने ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन महेश फालक यांनी केले. कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोेषिक वितरण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी चेअरमन महेश फालक होते.

यांची होती उपस्थिती
प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष विनायक ढाके, सचिव विष्णू चौधरी, प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस.व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. बी.एच. बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए.डी. गोस्वामी, उपप्राचार्य एन.ई. भंगाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. यु.बी. नंदाने उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. वायकोळे यांनी संस्थेच्या प्रगतीविषयीचा आढावा व महाविद्यालयास लाभलेले संचालक मंडळाचे सहकार्य याविषयी उहापोह केला. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महेश फालक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयात सर्व शाखांच्या परिक्षांमध्ये तसेच विद्यापीठीय परिक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि एनएसएस व एनसीसी जीमखाना विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेेल्या 75 गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम
याशिवाय यावर्षी पीएच.डी. पदवी संपादन केलेले प्रा. आर.एस. नाडेकर, प्रा. गौरी पाटील यांचादेखील गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन व आभार प्रा. आर.आर. पाटील, प्रा.डॉ. रुपाली चौधरी, प्रा. नयना पाटील यांनी केले तर यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. एन.एस. पाटील, प्रा. एस.टी. धूम, प्रा. विद्या पाटील, प्रा.डॉ. रश्मी शर्मा, प्रा. व्ही.डी. जैन, प्रा. ममता पाटील, प्रा. दिपक पाटील, प्रा. प्रशांत पाटील, स्मिता बेेंडाळे, रेखा बर्‍हाटे, भगवान तायडे आदींनी परिश्रम घेतले.