विविध मागण्यांचे रेल्वे स्टेशन प्रबंधकांना निवेदन

0

चाळीसगाव । भिमा कोरेगाव हल्ल्याप्रकरणी कटातील मुख्य सूत्रधार मनोहर भिडे व मिलींद एकबोटे यांना त्वरीत अटक करावी आदी मागण्यांचे निवेदन चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 16 जानेवारी 2018 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास देण्यात आले. यापुर्वी 16 रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे पोलीस प्रशासन खडबडुन जागे झाले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवु नये म्हणुन रेल्वे व शहर पोलिस स्टेशनच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय मजदूर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कालीदास अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक एन.पी.बडगुजर यांना दिलेल्या निवेदन देण्यात आले.

पिरिपाच्या या आहेत मागण्या
1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगाव येथे शुरविरांना मानवंदना देण्यासाठी लाखो भिमसैनिक गेले असता काही समाज कंटकांनी कट कारस्थान करुन घातपात घडवुन हल्ले करण्यात आले. या कटामागील मुख्य सूत्रधार मनोहर (संभाजी) भिडे व मिलींद एकबोटे यांना त्वरीत अटक करावी, भिम सैनिकांवरील दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावे, भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवु नये, चाळीसगाव रेल्वे स्थानकाबाहेर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा, चाळीसगाव रेल्वे स्थानकावर पत्री शेड उभारावे याविषयांवर लक्ष देवून न्याय मिळावा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष प्रदिप अहीरे, मिलींद झाल्टे, विजय पगारे, प्रमोद गवळे, हेमराज अहिरे, पंकज चव्हाण, विजय शेजवळ, नितीन जवराळे, मयुर बागुल, रविंद्र गायकवाड, रोहित निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.