विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीेंच आमारण उपोषण

0

जळगाव । शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुला-मुलींनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. यावेळी त्यांनी विविध घोषणा दिल्या. या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. अशा आहेत मागण्या..शासकीय आदिवासी मुलीेंचे वसतिगृह जळगाव येथे वाढीव जागा उपलब्ध करून द्यावे, ज्या मुला-मुलींनी या शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची त्वरीत व्यवस्था करावी, ज्या विद्यार्थ्यांनी खास बाब म्हणून अर्ज सादर केलेला आहे, त्यांची तत्काळ यादी जाहीर करावी. यासह प्रकल्प अधिकारी यांना वेळोवेळी दिलेल्या निवेदनांची पुर्तता येत्या पाच दिवसांत पूर्ण करण्यात आली नाही तर जिल्ह्याभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.