विविध मागण्यांसाठी ‘मेस्टा’चे जिल्हा परिषदेसमोर धरणे

0

जळगाव । विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना (मेस्टा) यांच्यातर्फे शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी जिल्हा परीषदेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना दिले. शुल्क अधिनियम कायदा रद्द करावा, वर्षभर शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांचा पुढील वर्षाचा प्रवेश रद्द करण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला मिळावा, शिक्षक पालक संघाने ठरवल्या प्रमाणे 25 टक्के आरक्षित प्रवेश शुल्क अदा करावे, शाळेला व्यावसायिक दाराने वीज बिल व मालमत्ता कर आकारू नये, शाळेसाठी स्वतंत्र्य संरक्षण कायदा करावा, विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनास रस्ता कराशिवाय अन्य कर लागू करू नये, इंग्रजी शाळांना स्थलांतराची परवानगी द्यावी, नैरर्गिक वर्गवाढ व दर्जावाढचा अधिकार शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांचा कार्यकक्षेत यावे. अश्या विविध मागण्या साठी धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.

प्राथमिक शिक्षाधिकारी यांच्याशी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची चर्चा केली असता त्यांनी मागणीबाबत शासनाला कळविण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना यावेळी मेस्टाचे जिल्हाध्यक्ष नरेश चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, जिल्हा संघटक डॉ.एस.डी. महाजन, शैलश सपकाळे, अरविंद जाधव, शशिकांत महाजन, शंकर चिनावलकर, व्ही.एस.पाटील, अनिल पाटील, प्रविण तेली, डॉ.एस.डी.महाजन यांच्यासह संघटनेचे पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.