विविध मागण्यांसाठी रावेरला उपोषण

0

रावेर– विविध मागण्या मान्य करण्यासह प्रशासनाने मागण्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी मुज्जस्सअली शब्बीर यांच्यासह पाच ते सहा जण आमरण उपोषणाला तहसील कार्यालयासमोर बसले आहेत. सार्वजनिक जमिनीपासून मिळणार्‍या नफ्याचा हिशोब दाखवित नसल्याच्या कारणा वरुन उपोषण छेडण्यात आले. काझी, वसीम खान, हाजी इस्माईल, सलिम शहा, शेख शाबीर, अकील खा, सलीम मंत्री, हसन शेख आदींनी उपोषणात सहभाग नोंदवला आहे. मागण्यांवर उपोषणार्थी कायम आहेत.