पिंपरी: कोविड-१९ कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रावरच नाही तर पुर्ण जगावर संकट आहे. या संकटा विरुध्द ज्यांनी लढा दिला अशा कोरोना योध्दांचे थेरगाव सोशल फाऊंडेशनतर्फे सन्मान करण्यात आले. लाॅकडाऊनमध्ये दुसऱ्यांदा सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन रक्तदान शिबीर घेण्यात आले. पहिल्या शिबिरात २८३ रक्त दात्यांनी रक्तदान केले तर दुसऱ्यांदा ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच लाॅकडाऊनमध्ये सर्वात मोठा फटका हा प्रिंट मिडीया म्हणजेच पत्रकार बंधुना बसला त्यांना छोटी मदत म्हणुन १५० किटचे वाटप करण्यात आले. यासह विविध सामाजिक उपक्रमांनी थेरगाव सोशल फाऊंडेशनचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.