विवेकानंदनगरात अज्ञातांकडून तीन रहिवाश्यांच्या घरांवर दगडफेक

0

जळगाव । रामानंदनगर जवळील विवेकांनद नगरमध्ये शनिवारीच्या मध्यरात्री 12.45 वाजेच्या सुमारास दोन स्पोटर्स दुचाकीवर अज्ञात सहा जणांनी तीन घरांवर दगडफेक केल्याची घटना घडली असून परीसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरूपाची तक्रार किंवा गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. रहिवाश्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवेकांनद कॉलनीत तिघा घरांवर शनिवारी 12.45 वाजेच्या सुमारास अज्ञात 6 भामट्यांनी स्पोर्टस् बाईकवर येवून विवेकानंद नगरातील रहिवाशी केशव लक्ष्मण अमृतकर विटेचे तुकडे आणि अर्धा वजनाचा दगड काचेच्या खिडकीवर आणि उभी असलेल्या कार फेकून मारले. यावेळी अमृतकर यांच्या घराच्या पुढच्या खोलीत मुलगा नरेंद्र अमृतकर हा झोपेतून उठून बाहेर येवून पाहिले असता त्यांना दोघे बाईकवर पळून जातांना दिसून आले. त्याच नगरातील प्लॉट नं.55 मध्ये राहणारे गोकुळ बाबुराव तायडे यांच्या घरावर त्यांनी खिडकीवर दगड मारून खिडकीच्या काचा फुटल्या. या दगडफेकीत मात्र घरात झोपलेली लहान मुलगी थोडक्यात बचावली. त्यानंतर तिन इमारत सोडून प्लॉट नं. 56 मध्ये राहणारे रमेश भिका देशमुख यांच्या दुसर्‍या मजल्यावर घर आहे. याठिकाणी अज्ञात भामट्यांनी घराजवळ येवून दगड मारल्याचे देशमुख यांच्या मुलाने सांगितले.

दुसर्‍यांदा दगडफेकीची घटना
विवेकानंद नगरात रहिवाशी गोकुळ नरेंद्र तायडे यांच्या घरावर यापुर्वी दीड महिन्यापुर्वी अशी दगडफेक करून त्यांच्या खिडकीच्या काचा फोडल्या होत्या. तायडे हे जळगाव महानगरपालिकेत नोकरी असून त्यांचे कोणाशी वैर नसतांना दगडफेक केली, असे तायडे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तर देशमुख यांच्या घरावर दगडफेक करण्यापुर्वी या भामट्यांनी दुमजलीवर जावून दरवाजाला कडी लावून खाली आले व दगडफेक केली. कारण दरवाजा आणि खिडकीसमोर भिंतीला लावलेला कुलरची अडचण होत असल्याचे देशमुख यांच्या मुलाने सांगितले. दरवाजा बाहेरून बंद असल्यामुळे देशमुखांच्या बाजूला राहणारे रहिवाशी सुनिल पाटील यांना रात्री मोबाईलवर फोन करून दरवाजा उघडला. तसेच अज्ञात भामटे हे दोन स्पोर्ट्स बाईकवर सहा जण असल्याचा संश य रहिवाश्यांकडून होत आहे.