विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने ‘रंग बावरा श्रावण’ या श्रावण गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

0

जळगाव :  “रंग बावरा श्रावण” श्रावण गीतांचा कार्यक्रम,  विवेकानंद  प्रतिष्ठान, जळगाव यांच्या वतीने आज २८ ऑगस्ट २०१८ मंगळवार रोजी कांताई सभागृह जळगाव येथे सायं. ६ वाजेला  “रंग बावरा श्रावण” “लपे ढगा मागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला… सृष्टीत सुखाची करीत पेरणी,आनंदाचा धनी श्रावण आला….! या श्रावण गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या श्रावण गीतांच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती. शोभाताई पाटील व सचिव राजेंद्र नन्नवरे  उदघाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, यातील काही गीते स्व –रचित व संगीत शिक्षकांनी स्वत: गीतांना स्वरबध्द केलेले  आहे व  विवेकानंद प्रतिष्ठानच्या सर्व शाळेतील ३०० विद्यार्थीकलाकार एकाच वेळी या गीतांचे सादरीकरण करणार आहेत. यामध्ये गायक  व वादक  हे विद्यार्थीच आहेत.