विवेकानंद प्रतिष्ठानच्या ४०० विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

0

जळगाव- विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज १ ऑक्टोबर रोजी उद्या गांधी जयंती व राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून ४०० विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानची शपथ घेतली.

ब्रिटीशांनी भारतावर २०० वर्षे राज्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानी यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली अशाच महान स्वातंत्र्य सेनानींपैकी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सन्मय कोतकर याने केले तर प्रास्ताविक अर्चना पाटील यांनी केले. तसेच ज्ञानदिप कलाल आणि मानव ठाकुर या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी स्वच्छ भारत अभियानची विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून सौ. जयश्री पाटील आणि अर्चना पाटील यांनी नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे सहकार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.