विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर मार्गदर्शन

0

जळगाव- विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये विशाखा समितीतर्फे ‘सायबर सिक्युरिटी’ या ई- युगातीलज्वलंत व निकडीच्या विषयावर जगदीश आसोदेकर ( CISO – मुंबई ) यांचे इ. ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

आजच्या online युगात काळाबरोबर चालताना आपण सुरक्षित राहावे या हेतूने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘जगाशी कनेक्ट होताना आधी स्वत:ला सुरक्षित करणे’ हे किती व का गरजेचे आहे ? याबद्द्ल श्री. जगदीश आसोदेकर यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या शब्दात,तसेच विद्यार्थ्यांशीच निगडीत असलेल्या रोजच्या व्यावहारिक उदाहरणद्वारे मार्गदर्शन केले. तसेच ई- जगताच्या अतिरेकी वापरामुळे होणारे शारीरिक,मानसिक, आर्थिक, सामाजिक इ. बाबत संभाव्य धोके आणि त्याबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच चर्चेद्वारे विद्यार्थ्यांचे शंकानिअरसन केले.

यावेळी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील सर ,समन्वयक गणेश लोखंडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती. प्राजक्ता यावलकर व परिचय स्वाती बेंद्रे यांनी करून दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.