जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, पूर्व – प्राथमिक विभागात “व्हाईट कलर डे” साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश्य विद्यार्थ्यांना पांढऱ्या रंगाचे ज्ञान व्हावे व त्यांची संकल्पना स्पष्ट व्हावी. यासाठी रवा, मैदा, तूप, दूध, पांढऱ्या रंगाच्या प्राण्यांचे चित्र आणि पांढऱ्या रंगाच्या विविध वस्तूंची व पदार्थांची मांडणी करण्यात आली होती. सौ. विद्या देसाई यांनी विद्यार्थ्यांना वस्तू दाखवून माहिती दिली.
या उपक्रमात मुलांनीदेखील पांढऱ्या रंगाचेच वेश परिधान केले होते. शाळेच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा पांढऱ्या रंगाचेच वेश परिधान केलेले होते. विद्यार्थ्यांनी मोगरा, मुळा, देवी सरस्वती, महात्मा गांधी यांची वेशभूषा करून माहिती दिली. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ. विद्या देसाई, सौ. वैशाली चौधरी व सौ. सुवर्णा चौधरी यांनी केले होते.
या उपक्रमाला शाळेचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील सर व समन्वयिका सौ. सविता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.