जळगाव । भारतीय शालेय क्रीडा महासंघ (नवी दिल्ली) आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अयोजित सांगली येथे 14 वर्षे वयोगटातील मुले/ मुली या विभागाची शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी विशाल पाटील (पाचोरा) व प्रेमचंद चौधरी (भडगाव) या दोघांची पंच म्हणून नियुक्ती राज्य संघटनेने केली आहे.
या निवडी बद्दल असोसिएशनचे अध्यक्ष आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रा. डी. डी. बच्छावसर, चौधरी, गणपतराव पोळ, गुरुदत्त चव्हाण, उदय पाटील, सुनील समदाणे, सौ. विद्या कलत्री, एन. डी. सोनवणे, जयांशु पोळ, चंद्रकांत महाजन, अंनता सैदाणे, राहुल चौधरी, राहुल पोळ, प्रशांत कोल्हे यांनी कौतुक केले आहे.