डीआरएम आर.के.यादव यांनी कर्मचार्यांचे केले कौतुक
भुसावळ- 1 ते 20 नोव्हेबर या महिनाभराच्या काळात पाच हजार 557 फुकट्या प्रवाशांकडून 33 लाख 48 हजार 600 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असून कर्मचार्यांचा डीआरएम आर.के.यादव यांनी गौरव केला आहे. दिवाळी आाणि छटपूजेच्या काळात रेल्वे प्रशासनाने विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकांसह प्रत्येक रेल्वे गाडीत विशेष पथकाची नियुक्ती केली होती. दिवाळी आणि छट पूजेसाठी उत्तर भारतात जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने रेल्वे गाड्यांना असलेली गर्दी पाहता विना तिकीटाने प्रवास करणार्याची संख्यादेखील कमी नसते त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी डीआरएम आर.के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी संपूर्ण विभागात विशेष पथकांची नियुक्ती करीत धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्य. त्याच पार्श्वभुमीवर 1 ते 30 नोव्हेबर या काळात धावत्या रेल्वेत आणि प्रत्येक रेल्वे स्थानाकावर विशेष पथकांनी कारवाई करीत फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला तसेच आरक्षण नसतांना आरक्षण डब्यातून प्रवास करणार्या प्रवाशांनाही दंड भरावा लागला. यात पाच हजार 557 फुकट्या प्रवाशंकडून 33 लाख 48 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तर गेल्या वर्षी 1 ते 30 नोव्हेबर 2017 या काळात रेल्वे प्रशासनातर्फे विशेष मोहिम राबवली होती, त्यात 33 लाख नऊ हजार 980 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.