विश्रामजीन्सी येथे आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या

0

रावेर- आजाराला कंटाळून तालुक्यातील विश्रामजीन्सी येथील एका इसमाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विश्रामजीन्सी येथील विजय मांगीलाल जाधव (35) याने लखव्याच्या आजाराला कंटाळून घरात असलेले कीटकनाशक प्राशन केले. त्यास येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत मांगीलाल जाधव यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.