नवी दिल्ली । भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार्या 17 वर्ष गटाचा फिफा विश्वचषक लोकांना पहायला मिळावा म्हणून 17 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीत 40 दिवसांच्या कालावधीत 9000 किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहे. फिफा आणि आयोजन समितीने विश्वचषकाच्या देशव्यापी दौर्याचे वेळापत्रक सोमवारी जाहिर केले.
स्पर्धेतील सामने ज्या शहरांमध्ये होणार आहे त्या शहरांमधील नागरिकांना हा चषक बघण्याची संधी मिळणार आहे. हा विश्वचषक 17 ते 22 ऑगस्टदरम्यान दिल्लीमध्ये, 24 ते 29 ऑगस्टदरम्यान गुवाहटीमध्ये, 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान कोलकात्यात, 6 ते 10 सप्टेंबरदरम्यान मुंबईत, 14 ते 19 सप्टेंबर दरम्यान गोव्यात आणि 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान कोचीमध्ये मुक्कामाला असणार आहे. भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रमुख प्रफुल्ल पटेल म्हणाले की, फिफा विश्वचषक जवळून बघण्याची देशातील फुटबॉलप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी आहे. हा चषक बघण्यासाठी नागरिक बहुसंख्येने येतील त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी वेगळी वातावरण निर्मिती होईल. 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या स्पर्धेत भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल अशी आशा आहे.