जळगाव। विश्वमंगल योग व निसर्गोपचार केंद्रातर्फे रविवारी 11 रोजी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत शिबीर सुरु होते. शिबीरात तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली. सर्व आरोग्य विषयक समस्येचे शिबीरात निराकरण करण्यात आले.
शहरातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. डॉ.भावना चौधरी, डॉ.मनिष चौधरी, योग प्राध्यापिका प्रा.चित्रा महाजन, तुषार वाघुळदे यांनी शिबीरात रुग्णांची तपासणी केली.