विश्‍वशांतीसाठी सामूहिक नमाज पठन

0

जळगाव । शहरात पवित्र रमजान इदनिमित्त ईदगाह मैदानांवर तसेच सुप्रीम कॉलनीतील सुन्नी ईदगाह मैदानांवर हजारो मुस्लिम बांधकवांनी नमाज पठण केले. पवित्र रमजान उपवासाची सांगता काल चंद्रदर्शन योग घेवून मुस्लीम बांधवांनी केली. सकाळी 9 वाजता शहरातील अजिंठा चौफुली जवळील ईदगाह मैदांनावर हजारो मुस्लिम बांधव एकत्रित आलेत. यानंतर त्यांनी सामुहिक नमजा पठन केले. याप्रसंगी करीमभाई सालार, गफ्फारभाई मलिक, अमिन भादलीवाला, फारूख शेख आदी उपस्थित होते.

मस्जिदसाठी ईदी जमा
अल्लाह-ईश्‍वर सर्व मानव जातीला यशस्वी कर व आम्हास शेती व पिण्यासाठी योग्य तो पाऊस दे,विश्‍वामध्ये शांती लाभू दे, अशी प्रार्थना मौलाना उस्मान कासमी करीत असतांना हजारो मुस्लीम बांधवांनी यावेळी आमीन म्हणत जळगाव ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली.तत्पुर्वी ईदगाहचे विश्‍वस्त फारूक शेख यांनी मुफ्ती अतीकुर्‍हमान यांचा परिचय करुन देत ईदचे विश्‍व शांतीसाठी महत्व या विषयावर मार्गदर्शन करण्याची विनंती केल्यानंतर मुफ्तींनी मुस्लीम बांधवांना मार्गदर्शन केले. अब्दुल करीम सालार यांनी प्रस्ताविक केले. मौलाना उस्मान यांनी खुतबा व नमाज पठन केले. अमीन बाटलीवाला यांनी आभार मानले. पिंप्राळा येथील मस्जिदसाठी इदी जमा करण्यात आला. ईदगाहचे विश्‍वस्त व मुस्लिम समाजाला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी राजे निंबाळकर,एस.पी. दत्तात्रय कराडे, सीईओ , एसडीपीओ सचिन सांगळे,पी. आय. सुनील कुर्‍हाडे, अनिरुद्ध आढाव यांनी ईदगाह मैदानात येऊन पुष्पगुच्छ देऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. मुस्लीम समाजातर्फे गफ्फार मलिक, करीम सालार, फारूक शेख,अमीन बाटलीवाला,रागिब जागीरदार,अय्यान जागीरदार,गनी मेमन,ड. आमिर शेख,शरीफ शेख,प्रो.डॉ. इक्बाल आदींची उपस्थिती होती.

सुन्नी ईदगाह मैदानावर नमाज पठन
सकाळी 9.30 वाजता सुप्रिम कॉलनी परीसरातील सुन्नी ईदगाह मैदानावरही हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. नमाज पठनानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेवून ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. रमजान हा इस्लामिक चांद्र पंचांगातील नववा महिना आहे. या काळात सूर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत उपवास करुन रोजा पाळला जातो. महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो.

इदगाह मैदानावर हजारोंची उपस्थिती
आज रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त मुस्लीम बांधवांनी सकाळी 6 वाजेपासूनच ईदगाह मैदानावर उपस्थीतीसाठी चांगलीच रिघ लागली होती. यावेळी पोलीसांकडून जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने ईदच्या सणाला शांततेत नमाज पठण करुन अल्लाहकडे विश्‍वाच्या शांततेसाठी प्रार्थना करुन सर्वत्र पाऊस पडू दे ! अशी प्रार्थना मौलाना उस्मान कासमी यांनी केली. यावेळी सर्व उपस्थितांना अमीन म्हणून याला दुजोरा दिला.

ईद उत्साहात साजरी
याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा रजवी, मौलाना नजमुल हक, मुफ्ती मौलाना रेहान रजा अशरफी, मौलाना मुफ्ती, इन्तीखाब अशरफ, मौलाना जुबेर आलम, मौलाना अब्दुल रहीम, इकबाल वजीर, शाकीर मेमन, मुख्तार शाह, मौलाना अ. हमीद, मौलाना अगिम याच्यासह जवळपास 15 हजार मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यात आली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

भेटवस्तूंची देवाणघेवाण
सकाळी 9 वाजता नियाज अली नगर येथील सुन्नी ईदगाह मैदानवर मौलाना जाबीर रजा रजवी यांच्या नेतृत्त्वात नमाज-ऐ-ईद-उल-फित्र अदा (पठन) करण्यात आली. प्रास्तविक व मनोगत सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी केले. तरीका-ऐ-नमाज(नमाज पठनची पध्दत) मौलाना नजमूल हक यांनी सांगितले. नमाज व खुतबा मौलानी जाबीर रजा रजनी यांनी केले आहे. सलातो सलाम मौलाना जुबेर आलम यांनी म्हटले. याप्रसंगी मौलाना नजमुल हक यांनी ‘ए अल्लाह हमपर रहेम फरमा, करम फरमा. चांगला पाऊस पडून सर्वत्र शांती व हिरवळ, शेती वाढू दे. देशाचे व देशवासीयांचे शुत्रूपासून रक्षण कर. सर्वत्र शांती, उन्नती, प्रगती वाढू दे. राष्ट्रीय एकत्मता व बंधूभाव वाढु दे. बेरोजगरांना रोजगार दे अशी दुआ मागितली. यावेळी महानगरपालिका, पोलीस दल व उपस्थितांचे आभार व स्वागत सै. अयाज अली नियाज अली यांनी मानले. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. ‘ईद उल फित्र’ निमित्त जिल्हाभर चोख पोलिस बंदोबस्त होता.

नमाज पठनानंतर मागितली दुआ
रमजान ईद असल्याने आज शहरातील तांबापुरा, भिलपुरा, शनिपेठ, शाहूनगर या ठिकाणच्या मशिदींमध्ये मुस्लिम भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी होती. ईदनिमित्त बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विविध खाद्यपदार्थ, कपडे आदी खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होती. ईदचा शिरखुर्मा खाण्यासाठी ठिकठिकाणी नातेवाइकांना आमंत्रित करण्यात आले होते. नमाजपठणानंतर दुवाचा कार्यक्रम झाला.