विश्‍व शांतीसह आबादानीसाठी सामूहिक नमाज पठण

0

रमजान ईद उत्साहात ; भुसावळात हिंदू-मुस्लीम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा

भुसावळ- संपूर्ण जगात शांती नांदावी, हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये एकोपा व जातीय सलोखा टिकून राहण्यासह यंदा पाणी-पाऊस समाधानकारक व्हावा, अशी प्रार्थना सामूहिक नमाज पठणातून करण्यात आली. शनिवारी रमजान ईद निमित्त खडका शिवारातील नवीन ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले. मौलाना फरीद रजा खान यांनी नमाज पठण केले. याप्रसंगी हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

लोकप्रतिनिधींही दिल्या शुभेच्छा
नमाज अदा झाल्यानंतर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, गटनेता मुन्ना तेली, प्रमोद नेमाडे, रिपाइं (गवई) गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, मनोज बियाणी, मुकेश गुंजाळ, सतीश सपकाळे, वसंत पाटील, राजू खरारे, तानसिंग पाटील, माजी सरपंच चुडामण भोळे तर युवा कार्यकर्ता सचिन चौधरी, जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, सोपान भारंबे, प्रदीप देशमुख, सचिन पाटील, नितीन धांडे, पवन नाले, काँग्रेसचे रवींद्र निकम आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आढावा घेतला. प्रसंगी नायब तहसीलदार संजय तायडे, निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पत्रकार शेख सत्तार, कलीम पायलट, सुनील आराक, शेख शाहीद रजा, ईदगाव पंच कमेटीचे डॉ.मेहमूद हुसेन, अल्लाबक्ष शहा, डॉ.रफिक अहमद खान, तस्लीम पहेलवान, रहिम शहा, रशीद ठेकेदार आदींची उपस्थिती होती.

शहरात रमजान ईदचा उत्साह
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची शुक्रवारी 7.35 वाजता चंद्रदर्शन झाल्याने सांगता झाली. दिल्लीतील शाही जामा मशिदीच्या इमामांनी शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी ईद उल फित्र (रमजान ईद) साजरी होण्याची घोषणा केली. शहरातील खडका रोडवर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नमाज अदा करण्यात आली तसेच अन्य मशिदींमध्येही नमाज अदा करण्यात आली.