विश्‍व हिंदू परिषदेसह बजरंगदलातर्फे निवेदन सादर

0

तळोदा। गोमांस विक्री करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाच्यावतीने करण्यात आली आहे. तळोदा शहरात व परिसरात धडगांव,अक्कलकुवा, मोलगी येथून गौवंश व गाय यांचे अवैध विक्री व व्यापार होत आहे.

तसेच त्यांचे हाड,मांस यांचे खराब भाग शहरातील मध्यवर्धी नवीन वसाहतीत सापडत आहेत. त्यामुळे शहर व परीसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यातून रोगराई पसरू शकते. गौवंश खरेदी विक्री, गौवंश मांस विक्री करणारी टोळी तळोदा शहर व परिसरात मोठया प्रमाणावर सक्रीय झालेली आहे.त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रसिध्दीत दिलेल्या पत्रकांत केला आहे. या निवेदनावर जिल्हासहगौरक्षाप्रमुख विश्वहिदू परिषद अमन जोहरी, शहर संयोजक बजरंगदल सागर भोई ,शहर गौरक्षा प्रमुख शिवम सोनार , पराग राणे ,किरण ठाकरे, राज चौधरी, कृष्णा सोनार ,कुणाल आरवाडे, प्रफुल्ल वाध, रविदास बोरसे यांनी निवेदनावर सहया केल्या आहेत,