धुळे- राहत्या घरात काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सांजोरी गावात घडली आहे. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सांजोरीतील 24 वर्षीय देविदास त्र्यंबक ठाकरे (पाटील) या युवकाने घरात कुणी नसल्याचे साधत बुधवारी दुपारी वाजेच्या काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. नातेवाईकांनी त्यास धुळे येथील हिरे महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी देविदास यास तपासून मृत घोषित केले. देविदास याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.