A 22-year-old married woman in Sakli Sttempted Suicide यावल : तालुक्यातील साकळी येथे एका 22 वर्षीय विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच विवाहितेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विवाहितेवर जळगावात उपचार
प्रथमोपचारानंतर अधिक उपचारार्थ विवाहितेला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. साकळी जरीना सलमान तडवी (22) ही विवाहिता शुक्रवारी घरी एकटी असताना तिने घरात रागाच्या भरात काहीतरी विषारी द्रव प्राशन केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवण्यात आले. रुग्णालयात डॉ.वैशाली निकुंभ, अधिपरीचारीका जॉन्सन सोरटे, विजय शिंदे, सुमन राऊत आदींनी तिच्यावर प्रथमोपचार केले मात्र तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.