विष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव – घरगुतीच्या किरकोळ कारणावरून 35 वर्षीय मजूराने 5 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी पिक फवारणीचे विष प्राशन केले. त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून झीरो नंबरने यावल पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आले आहे. मिळालेली माहिती अशी की, चिंधू बंडू भिल (वय-35) रा. बोरावल दरवाजा, यावल यांनी घरातील किरकोळ कारणावरून 5 ऑक्टोंबर 2018 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पिकांवर फवारणीचे विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा समान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अखेर सोमवार 15 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीसात आकस्मा मृत्यूची नोंद करण्यात आली असून शुन्य नंबर यावल पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आले आहे.