विस्कळीत पाणी पुरवठ्या बाबत दोषींवर कारवाई करा

0

धुुळे । मोगलाई परिसरातील सर्व प्रभागांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिस्थिती सुधारेल म्हणून नागरिक, नगरसेवक संयम बाळगून आहेत. मोगलाई भागात अनेक व्हील लिक असून महिनों न महिने त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे दुर्गंधीयुक्त, गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. मुळात फिल्ट्रशेन प्लॅन्ट वरुन पिवळेे पाणी साडेले जाते. त्यावर देखील उपाय केला जात नाही. काही तांत्रिक चुका आम्हीही समजू शकतो. परंतु ती सुधारली जात नसले तर प्रशासन निर्ढावले आहे असा आरापे काही नगरसेवकांनी पाणी समस्या संदर्भात मनपा आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना करा
नागरिक वा नगरसेवकांचा संयम सुटला म्हणजे मार्चेे आंदोलने केली तर शासकीय कामात अडथळा आणायचे गुन्हे दाखल करण्यात तत्परता दाखविली जाते. परंतु स्वत:ची जबाबदारी व वैधानिक कर्तव्य कुणीही अधिकारी समजून घेण्यास तयार नाहीत. पाण्याची जबाबदारी अधिकारी एकमेकांवर ढकलतात. यापेक्षा दुदैव ते काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांनी, नगरसवेक व अधिकार्‍यानां देखील पाणी प्रश्‍नाबाबत भंडावून सोडले आहे. परंतु कायम स्वरुपी उपाययोजना केली जात नाही. तक्रारीची योग्य दखल व चौकशी करावी, दोषी कर्मचारी, अधिकार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करावी व पाण्याचे योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी महिला व बाल कल्याण सभापती माधुरी अजळकर,नगरसेविका सुशिलाताई ईशी, मुक्ताताई गवळी,नगरसेवक नरेंद्र परदेशी,कुमार डियालानी, विश्‍वनाथ खरात, सुभाष खताळांनी केले आहे.