विस्तारीत बजरंग बोगदा लवकरच रहदारीसाठी सुरू करा

0

जळगाव । शहरातील भोईटे नगर या परिसरात रेल्वे लाईन असल्यामुळे भोईटे नगर रेल्वेगेट शिवाय अरुंद अश्या बजरंग बोगद्याव्दारे नागरीकांना ये-जा करावी लागते. या बोगद्याचा वापर वाढीव भागातील नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी करीत असतात मात्र येथे गर्दी होत असते. समस्येचे निवारणार्थ विस्तारीत बजरंग बोगद्याचे काम हाती घेण्यात आले होते.

यांची होती उपस्थिती
हे काम पुर्ण झालेले असून वाहतुकीस सुरु करण्यासाठी उपाययोजना करणे तसेच पावसाच्या पाण्याचा सुयोग्य निचरा होणे कामी आज महापौर ललित कोल्हे व आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी रेल्वे अधिकारी यांचेसह विस्तारीत बजरंग बोगद्याची पाहणी करुन संबंधितांना अभियंता यांना उपाययोजना करुन बोगदा लवकरात लवकर नागरीकांच्या रहदारी सुरु करणे बाबत सूचना दिल्या आहेत. याप्रसंगी मनपा सभागृह नेता नितिन लढ्ढा, नगरसेवक संदेश भोईटे, राजु पटेल, अजय पाटील, दुर्गेश पाटील, शहर अभियंता दिलीप दाभाडे, सहा.अभियंता सुनिल भोळे, आरोग्याधिकारी उदय पाटील,अभियंता प्रसाद पुराणिक, योगेश वाणी, रेल्वेचे आरोग्य निरीक्षक जे.पी. वर्मा, मनपा आरोग्यनिरीक्षक के.के. बडगुजर, एन.एम. साळुंखे आदी तसेच संबंधित रेल्वे व मनपा कर्मचारी उपस्थित होते.