विस्थापितांना रोखल्याने रस्त्यातच आंदोलन

0

नंदुरबार । विस्थापितांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करणार्‍या मेधा पाटकरांसह प्रमुख आंदोलकांना गुजरात पोलीसांनी रोखले. यामुळे अखेर रस्त्यावरच आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अवलंबिला गेला. तथापि या सर्वांना अटक पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळी साधारणपणे अकरा वाजेला सरदार सरोवर प्रकल्पाजवळ जवळ (कवास जि.छोटा उदयपूर.केवडीया कॉलनी) ही कार्यवाही झाली.

केवडीयाच्या आदिवासी पुनर्वसनाची मागणी
केवडीयाच्या आदिवासींचे पुर्नवसन झाले नाही म्हणून वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. देशातील वेगवेगळ्या आंदोलनाचे प्रमुख आज या ठिकाणी जाणार होते. महाराष्ट्रातील चिमलखेडी येथील जीवन शाळेत गुजरात मार्गे पोहोचत असतांना पोलिस अधिक्षकांच्या उपस्थितीत रस्त्यांवरकडे करून सर्वांनाच रोखण्यात आले. तुम्हाला गुजराथ मध्ये जाऊ देऊ नये.असे आदेश असल्याचे यावेळी आंदोलकांना सांगण्यात आले. यावेळी सुमती सुर,आ.सुदिलम (मुलतान,मध्यप्रदेश),प्रफुल सामंतरा (ओडीसा),मधुरेशभाई कुमार (दिल्ली) कल्याण दुबळे व बबन पाखले (औरंगाबाद),प्रा.श्याम पाटील (धुळे) तसेच आय.आय.टी मुंबई, दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी असे 200 कार्यकर्ते आहेत. यामुळे अखेर रस्त्यावरच आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अवलंबिण्यात आला. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप आंदोलकांद्वारे करण्यात येत होता.