वरणगाव- अंजनसोडे गावातील विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीची करड कोसळल्याने विरगावच्या मजूराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 24 रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मारोती शिंदे (40, विरगाव, औरंगाबाद) असे मयत मजुराचे नाव आहे. सुनील पुजो बर्हाटे (अंजनसोंडे) यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील विरगाव येथील विहिर खोदकाम मालक दत्तु वसंत अहिरे यांना 21 रोजी विहिरीचे खोदकाम दिले होत . चार मजूरांसह विहिरीचे खोदकाम सुरू असताना शुकवारी पहाटे विलास बनसोडे, सीताराम कोतकर, चंद्रभान गौरे व भानुदास पुर्ण नाव माहीत नाही तसेच मारोती शिंदे (विरगाव औरंगाबाद) हे विहिरीचे खोदकाम करीत असताना मारोती शिंदे यांच्या अंगावर विहिरीची बाजूची कराड कोसळली तर डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.क्षितीजा हेडवे यांनी मृत घोषीत केले. दत्तू वसंत अहिरे (विरगाव) यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.