यावल- तालुक्यातील कोळवद येथील भूषण डोंगर फेगडे (रा.सातोद, ता.यावल) हा युवक विहिरीत डोकावत असताना तोल गेल्याने त्याचा बुडाल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.कोळवद गावातील शेतकरी मिठाराम कृष्णा जावळे यांचे कोळवद शिवारातील शेत गट क्रमांंक 352 मधील शेतात भूषण डोंगर फेगडे हा तरूण हा गेला असता तो विहिरीत डोकावत असताना अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडून बुडून मरण पावला. दोन तासांनंतर फेगडेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत कोळवद पोलीस पाटील दीपक पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मृत फेगडे यांच्या मृतदेहावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.