विहिरीत पडलेल्या गायीला गो-सेवकांनी दिले जीवदान

0

भुसावळ- शहरातील फेकरी टोलनाका परीसरातील विहिरीत पडलेल्या गाईला गो-सेवकांनी जीवदान दिले. क्रेनच्या मदतीने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दोन दिवसांपासून विहिरीत अडकलेल्या गाईला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. राष्ट्रीय महामार्गावरील फेकरी टोलनाका परीसरातील विहिरीत एक गाय रविवारी पडली. दोन दिवसांनी रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आला. विहिरीत पाणी कमी असल्याने ही गाय जीवंत होती. याबद्दल गो-सेवक परीवारास माहिती कळवण्यात आली. यानंतर गोसेवक कृष्णा साळी याने स्वत: क्रेन उपलब्ध करुन जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून गायीला सुखरुप बाहेर काढले. विहिरीत पडल्याने किरकोळ जखमी झालेल्या गायीवर औषधोपचार करून तिला सोडण्यात आले. गो-सेवक रोहित महाले, विशाल टाक, शिवसेनेचे उमाकांत शर्मा व परिसरातील रहिवाशांनी मदत केली.