विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

0

नारायणगाव । पिंपरी पेंढार गावाच्या हद्दीत भक्ष्याच्या शोधात फिरणारा बिबट्या कोंबडवाडी शिवारात कालव्याजवळील विहिरीत पडला होता. त्याला मंगळवारी दुपारी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी पिंजर्‍यात जेरबंद करून विहिरीतून सुखरुप बाहेर काढले.

शेतकरी संभाजी तपासे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती माणिकडोह बिबट निवारण केंद्रातील डॉ. महेंद्र ढोरे यांना मिळाली. त्यांनी त्वरित पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. विहिरीत पिंजरा सोडून त्यांनी बिबट्याला जेरबंद केले. हा बिबट्या नर जातीचा असून तो 5 ते 6 वर्षाचा आहे. जेरबंद बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केल्याची माहिती ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. रघतवान यांनी दिली.