बोरखेडा शिवारातील घटना ; कारणांचा शोध सुरू
भुसावळ : फैजपूर परीसरातील बोरखेडा शिवारातील शेतात काम करणार्या सालदाराचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी महेंद्र देविदास पाटील (न्हावी) यांनी खबर दिल्यावरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पहाड्या देवसिंग बारेला (30, रा.न्हावी शिवार, ता.यावल) असे मयत सालदाराचे नाव आहे. बारेला हे रमेश भिकारी फिरके यांच्या कहारेमळा भागातील शेतात सालदार म्हणून कामास होते.