यावल : शेत विहिरीजवळ काम करीत असताना अचानक पाय घसरल्याने विहिरीत पडल्याने चुंचाळेतील वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. डिगंबर सदु कोळी (60) असे मयत वृद्धाचे नाव आहे.
यावल पोलिसात नोंद
चुंचाळे येथे डिगंबर सदू कोळी (60) हे राहतात. सोमवारी सकाळी नऊ वाजता ते गावालगत असलेल्या संजय पाटील यांच्या शेत गट क्रमांक 3 मध्ये शेत विहिरीजवळ काम करत होते. यावेळी त्यांचा पाय घसरून ते शेत विहिरीत पडले. हा प्रकार शेतमजुरांच्या निदर्शनास येतात त्यांनी तातडीने विहिरीजवळ धाव घेतली मात्र डिगंबर कोळी यांचा पाण्यात बुडून तो पर्यंत मृत्यू झाला. डिगंबर कोळी यांचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करीता आणण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात पिंटू कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीत शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. मयत डिगंबर कोळी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परीवार आहे.