वीजचोरीवर आता हायटेक यंत्रणा

0

शहादा । वीजचोरी रोखण्यासाठी दोन वर्षापूर्वी आय आर मीटर बसविले होते. पण रिमोटद्वारे त्यांची गती कमी करून चोरीचे प्रकार सर्रास होऊ लागल्याने वीज कंपनी हादरली आहे. चोरी रोखण्यासाठी आता आहे त्या मीटरमध्ये नविन सॉप्टवेअर इन्स्टॅाल करण्यात आले आहे. अशा मीटरची जर रिमोटने छेडछाड केली तर शंभर टक्के वेगाने ते पुढे पळून रीडींग वाढुन चोरी उघडकीस येणार आहे. शहादा शहरातील विज गळतीचे प्रमाण 34.28 टक्क्े आहे. यापूर्वी हे प्रमाण 40 टक्यापेक्षा अधिक होते. गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महावितरण कंपनीकडून शहरात विज चोरी तपासणीची धडक मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी दिली आहे.

नव्या मिटरचे फायदे
रात्रीच्यावेळी रिमोटद्वारे आय आर मीटरची गती कमी करून वीजचोरीचे प्रकार थांबतील. ज्या मिटरमध्ये 100 एवढी रीडीग झाली आहे. त्या ठिकाणी रिमोटचा वापर झाल्यास एक हजार युनिटचे बिल देण्यात येणार आहे. जे ग्राहक रिमोटचा साहाय्याने छेडछाड करतील त्यांना जास्तीचे बिल देण्यात येणार आहे.

एरिअल बंच केबलने दिलासा
शहरातील झोपडपट्टीत भागासह इतर ठिकाणी विजतारांवर आकडे टाकून विजचोरी करण्याचे प्रमाण अधिक होते. माञ गेल्या काळात महावितरण कंपनीने विजचोरी होत असलेल्या भागांमध्ये एरिअल बंच केबल टाकली आहे. या प्रकारातील केबलला रबरी वेस्टन असल्याने विजचोरीवर नियंत्रण येते. शहरातील या प्रकारांच्या केबल शहरातील विविध भागामध्ये टाकण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. नव्या साफटवेअरमुळे आता आय आर मीटर बसवल्या नंतर ग्राहकांनी, त्यांची गती रोखण्यासाठी रिमोटचा वापर केला तर मिटर 100 टक्के वेगाने चालणार आहे. रिमोटचा वापर केल्यानंतर जोपर्यंत विजेच्या सप्लाय बंद आहे. तोपर्यंत मिटर बंद राहिल.त्यानंतर सप्लाय सुरू झाला की मिटर वेगाने पळणार आहे. त्यामुळे नविन विजजोडणी घेताना विजमिटर योग्य आहे की नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. चोरीच्या प्रयत्नात रिमोटचा वापर केल्यास मिटरची रिडिग वाढून ग्राहकाला विज कंपनीकडे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

शहाद्यात विजचोरी करणारे ग्राहक
शहादा 1 = विजचोर 319
रक्कम 17 लाख 92 हजार
नाशिक पोलिसस्टेशनला 31 विजचोरांवर गुन्हे दाखल त्यांची रक्कम आहे. 4 लाख 83 हजार

शहादा 2 = विजचोर 460
रक्कम 4 लाख 65 हजार
नाशिक पोलिस स्टेशनला 14 विजचोरांवर गुन्हे दाखल त्यांची रक्कम 3 लाख 9 हजार

तळोदा = विजचोर 360
रक्कम 17 लाख 26 हजार

धडगाव = विजचोर 120
रक्कम 1 लाख 11 हजार

अक्कलकुवा = विजचोर 30
रक्कम 2 लाख 33 हजार

नाशिक पोलिस स्टेशनला 7 लोकांवर गुन्हा दाखल त्यांची रक्कम 1 लाख 27 हजार. असा एकुण विजचोरी करणारे ग्राहकांकडून 43 लाख 27 हजार रूपयांची विजचोरीचे बिल वसुल करण्यात आले आहे.

तारांवर अवैध आकडे
शहरात मागच्या तुलनेत सध्या विजगळती कमी आहे. मात्र काही व्यावसायिक घरगुती विजग्राहकांकडुन रीमोटचा वापर करून विजचोरी केली जाते. यासह ग्रामीण भागात तारांवर आकडे टाकुन विजेची चोरी केली जाते. महावितरणने गेल्या काळात विजचोरी करणार्‍या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उचलला होता. याच पध्दतीने शहरात विविध भागामध्ये अचानक तपासणी करून कारवाई केली जात आहे. तालुक्यातील विजचोरी नियंत्रणात आणण्यासाठी शहादा डिव्हिजन व उपविभागामध्येही मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे सध्या काही ठिकाणी होत असलेल्या विजचोरीवर नियंत्रण आहे.