वीज कंपनीतील कर्मचारी अभियंत्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

0

घोषणाबाजीने परिसर दणाणला : सर्व संघटना सहभागी

चाळीसगाव – विज राज्य अभियंते व कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी आज वीज वितरण कंपनीच्या लक्ष्मीनगर येथील मुख्य कार्यालयाबाहेर दिवसीय लाक्षणिक संप केला. यावेळी कृती समितीचे जवळपास 215 कर्मचारी सामील झाले होते. यावेळी घोषणाबाजी करीत पदाधिकार्‍यांनी परिसर दणाणून सोडला होता.

आमच्या मागण्या मान्य करा ?
वीज वितरण कंपनीच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात कृती समितीने आमदार उन्मेष पाटील यांना निवेदन सादर केले आहे. यात महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनानी सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अमलात आणणे व व्यवस्थापन आणि महावितरण कंपनीत राबवण्यात येत असलेल्या खासगीकरण करावयाचे धोरण थांबवावे. कंपनीचे कर्मचारी कमी न करता स्टाफ सेट अप लागू करावा. महानिर्मिती कंपनीच्या अधिकारात कार्यरत असलेल्या लघू जलविद्युत निर्मिती संचाचे शासनाने अधिग्रहण न करता शासनकर्ता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्य रत ठेवावे. महानिर्मिती कंपनीच्या 210 मेगावॅट संच बंद करण्याचे धोरण थांबवावे. तिन्ही कंपनीतील रिक्त पदे भरण्यात यावे. जुनी पेन्शन योजना धरतीवर नव्याने पेन्शन योजना लागू करावी. महाराष्ट्र सरकारच्या सर्व कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणून सामावून घेण्यात यावे समान काम समान वेतन बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज अभियंते कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने एक दिवसीय संप करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील 238 कर्मचारी संपात सामील झाले होते कामगार महासंघाचे, तांत्रिक कामगार युनियन , अभियंता असोशियशन. इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार कांग्रेस अशा सर्व संघटनांचे पदाधिकारी संपात सामील झाले होते.

आंदोलनात 238 कर्मचार्‍यांचा सहभाग
आजचा संपात अभियंता असोसिएशनचे 26 अभियंता ,कामगार महासंघाचे 63,कर्मचारी फेडरेशनचे 87, कर्मचारी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी 60, इंटकचे दोन पदाधिकारी अशी सर्व 238 पदाधिकारी संपात सामील झाले होते यावेळी अभियंता विभागीय अध्यक्ष जयेश सूर्यवंशी, सचिव सौरभ शर्मा, कामगार महासंघाचे विभागीय अध्यक्ष आर.सी. सूर्यवंशी, पी.पी. चौधरी, जयंत गायकवाड, प्रवीण अमृतकर, धनराज निकम, नितीन पाटील, महादू कोल्हे, राजेंद्र मिस्त्री, संजय पवार यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. आर.एस.पवार, जे.एन. बाविस्कर, प्रवीण अमृतकार कर्मचार्‍यांनी मनोगते व्यक्त केली. कर्मचार्‍यांनी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.