वीज कोसळून महिला आणि शेळीचे पिल्ले ठार

0

नांदेड: मांडवी परिसरातील मोहाडा शिवारात बुधवारी दुपारी वीज कोसळली. यामध्ये ५० वर्षीय महिलेसह शेळीच्या २ पिल्लांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मांडवी गावाजवळील मोहाडा येथे बुगीयाबाई पिताजी राठोड ( वय- ५०) ही महिला दुपारी तिच्या शिवारात काम करीत होती. त्यावेळी अचानक जोरदार पावस आणि विजेची कडकडाटाला सुरुवात झाली. या पावसापासून बचाव करण्यासाठी बुगीयाबाई शिवारातील झोपडीकडे जात असताना तिच्यावर वीज कोसळली आणि तिच्यासह शेळीच्या दोन पिल्लांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेप्रकरणी मांडवी पोलिसात आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.