दिलासादायक: वीज बिलात सूट मिळण्याची शक्यता

0

मुंबई: कोरोनामुळे आर्थिक संकट असताच आता वीज बिले येण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकांना वाढीव वीजबिलाचा झटका बसला आहे. त्यामुळे ग्राहक प्रचंड नाराज होते. वाढीव बिलाबद्दल विरोधी पक्षाने देखील सरकारला लक्ष केले आहे. दरम्यान आता मात्र घरगुती ग्राहकांना दिलासा देण्याचा राज्य सरकारकडून विचार सुरु असून घरगुती वीज बिलात सूट मिळण्याची शक्यता आहे. घरगुती वीज बिलात २०-३० टक्के सूट देण्याबाबत निर्णय होऊ शकतो. आज बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऊर्जा मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात वाढीव वीज बिलात ग्राहकांना सूट देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. वीज बिलात सूट देण्याचे अधिकार एमएआरसीला असल्याने राज्य सरकार एमएआरसीला वीज बिलात सूट देण्याबाबत प्रस्ताव देणार आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.

राज्यात ७३ लाख घरगुती वीज घरगुती ग्राहक आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु आहे.