वीज ग्राहकांना मोठा दिलासा ; वीज बिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित

0

भुसावळ शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या मागणीला यश

भुसावळ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि या लॉकडाऊनमुळे देशभरातील आस्थापने, वेल्डिंग वर्कशॉप, सलून दुकाने, रसवंती, ज्युस दुकाने, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, हॉटेल्स बहुतेक सर्वच छोटे मोठे उद्योग आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला होता. परीणामी व्यावसायीकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिलातील स्थिर आकार/मागणी माफ करण्यात यावी व या सर्व वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व पदाधिकार्‍यांनी केली होती व या मागणीला आता यश आले आहे.

वीज बिलात सामान्यांचे 403 रुपये माफ
लॉकडाउनमुळे वीज वापर बंद असला तरी औद्योगिक आणि व्यावसायीक वीज ग्राहकांना भरमसाठ बिले पाठविली जात असल्याने अस्वस्थता पसरली होती मात्र या ग्राहकांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण बंद असलेल्या औद्योगिक आणि व्यावसायीक ग्राहकांना शून्य रुपयाचे वीज बिल देण्यात येणार आहे व स्थीर आकार 403 रुपये रद्द करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना धन्यवाद पत्र पाठवले
वापर नसतानाही सरासरीनुसार बिल आकारणी होत असल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता होती. लॉकडाउनच्या काळातील वीज बिलांची रक्कम भरताना त्यावर थकबाकी शुल्क किंवा व्याज आकारणी माफ झाली. तीन महिन्यानंतर बिल भरणा सुरू झाल्यानंतर पुढील तीन महिने तीन टप्प्यात बिल भरण्यासाठी मुभा या ग्राहकांना दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना धन्यवाद पत्र पाठवले आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी कळविले आहे.