वीज चोरट्यांविरोधात रावेरात धडक कारवाई

Mahavidran’s strike action against 13 electricity thieves in Rawer City रावेर : रावेर शहरातील मदिना कॉलनीत 13 वीज चोरट्यांविरोधात महावितरणच्या पथकाने वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरीकांची मोठी गर्दी झाल्याने ती नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

कारवाईने शहरात खळबळ
महावितरण विभागातर्फे रावेर शहरात वीज चोरी करणार्‍यांविरुध्द मोहिम राबवण्यात आली. महावितरणचे उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदिना कॉलनीत 13 वीज चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून संबंधिताना दंड देण्यात येणार आहे. शहरात ही मोहिम अशाच पद्धत्तीने सुरू राहणार असून कुणीही वीज चोरी करू नये, रीतसर कनेक्शन घेण्याचे अवाहन सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी केले. या पथकात समीर तडवी, देवेंद्र महाजन, संतोष जाधव, कर्मचारी सतीश चौधरी, भिका साळुंखे, अमोल हिवरे, धनंजय पाटील, चंद्रकांत ठाकूर, चेतन भरते, दिलीप कोष्टी, अरुण माळी, कल्पेश पाटील, महेश चौधरी यांचा समावेश होता.