भुसावळ । शहरातील जळगाव रोड परिसरातील श्रीनगर व अयोध्यानगर येथे नेहमीच कमी- जास्त दाबाने विज पुरवठा होत आहे, वारंवार विज डीपी वरील डीओ तुटतात फ्यूज उडतात. घरात असलेल्या विज उपकरानांचे वारंवार बिघाड होतो आहे तसेच उपकरणे बदलवन्याची वेळ येत आहे. आधीच वाढलेली विज बिले त्यात नविन उपकरणे घेणे खर्चिक बाब आहे. या ठिकाणी त्वरित नविन डीपी बसवावी अथवा तिथे असलेल्या डीपी दुरुस्त तरी करावी किंवा लोड सेटल करण्यासाठी नविन सुचवलेल्या जागेवर नविन डीपी बसवावी यासाठी विज वितरण कंपनीकडे 13 जून 2016 पासून प्रा.धिरज पाटील व रहिवासी यांनी अर्ज केला होता व पाठपुरावा सुरु केला होता. मात्र याकडे वितरणच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे.
आश्वासन देऊनही कारवाई मात्र शून्य
येथील अयोध्यानगर बजाज शोरुममागे विजेच्या कमी अधिक दाबाचा जास्त त्रास आहे. येथे तर नळ येतात आणि लाइट जाते याचे कारण शोधले असता असे लक्षात आले की विजेचा भार अधिक आल्यामुळेच विजपुरवठा खंडीत होत असतो, डियो जातो, मात्र याच्या दुरुस्तीसाठी वेळेत विज कर्मचारी येत नाही आणि पाणी ही भरले जात नाही, वितरण कंपनीने त्वरित कार्यवाही करावी ही मागणी सुद्धा प्रा. धिरज पाटील व नागरिकांनी केलेली होती त्या वेळेस अभियंता व्ही.डी.नवघरे यांनी नविन योजनेनुसार नविन डीपी बसवून देवू असे आश्वासन सुद्धा दिलेले होते. परंतु साधारण एक वर्षाचा कालावधी झाल्यावर सुद्धा कारवाई केलेली नाही.
रहिवाशांनी कंपनीला दिले निवेदन
श्रीनगर भागातील डीपी वरील डीओ वारंवार जातो, डीपी लावल्यापासून देखभाल केला गेला नाही. लोड नियोजन नाही. मागील दोन दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत. डीपी वरील समस्या निवारण केली गेली पाहिजे. तसेच जळगाव रोड परिसरातील पीसी- 2 क्षेत्रातील श्रीनगर, भोईनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, अष्टविनायक कॉलनी, हुडको कॉलनी, रेल दुनिया, वरद विनायक कॉलनी, गणेश कॉलनी, मोहितनगर, भिरुड कॉलनी, अयोध्यानगर, विद्यानगर, खळवाडी, शिवकॉलनी परिसर, स्वामी विहार, शालीन पार्क, स्वरुप कॉलोनी, वरद विनायक कॉलोनी, महालक्ष्मी नगर, सीताराम नगर, नारायण नगर 1, 2 व 3, गोदावरी नगर, मोरेश्वर नगर आदी भागातील सर्व डीपी दुरुस्त कराव्यात अशी मागणी प्रा. धिरज पाटील व नागरिकांनी केलेली आहे. मागील कित्येक वर्षापासून यांची दुरुस्ती रखडलेली आहे. या सर्व भागातील डीपी केव्हा केव्हा दुरुस्त अथवा देखभाल केलेली आहे तसेच नविन डीपी बसवण्यासाठी आपण काय कारवाई करणार आहात याची माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी.
रहिवाशांचा जीव धोक्यात
तसेच श्रीनगर परिसरातील एलटी लाइन व 11 केव्ही लाइनला अडथळा ठरु पाहणार्या वृक्षांची छाटणी करावी तसेच गॉर्डलाइन दुरुस्थी करावी. येथे वारंवार स्पार्किंग सारखे प्रकार घडत आहे. दोन दिवसांपूर्वी या परिसरात विज तारांना आग लागण्याचा प्रकार घडला होता. यामुळे जीवितहानी किंवा उपकरण बिघडने अशा घटना घडल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील अशा इशारा रहिवाशांनी निवेदनाद्वारे विज वितरण कंपनीला दिला आहे. याप्रसंगी रामचंद्र पाटील, नितिन पाटील, सचिन सूर्यवंशी, अमोल पाटील, महेश कोळी, पंकज खाचने, भूषण पाटील, धंनजय सोनवणे, विजय पाटील, रतिलाल कोळी यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले आहे. लोक भावनेचा मान ठेवून ही कामे त्वरित करावी अशी नागरिकांची मागणी आहे.