जळगाव । शहराचा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसांपासून उमाळा जलशुद्धीकरणावरील होणारा वीज पुरवठा खंडीत झाल्याने विस्कळीत झाला आहे. तसेच जलशुद्धीकरणावरील क्यबिक बॉक्समध्ये बिघाड होणे, विद्युत वितरण वाहीनीवर वादळामुळे वृक्ष कोसळणे, विद्युत वाहिनीवर कमी व जास्त दाब निर्माण होणे यासारख्या समस्या उद्भवत होत्या. सोमवार रात्री 9.50 मिनीटांनी वाघूर जलशुद्धीकरण महावितरणाच्या फिडर वारंवार ट्रिप होऊन वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. वीज पुरवठा खंडीत झालेल्या कालावधीत महापालिकेने मुख्य वितरण वाहिनीवरील तीन एअर व्हॉल दुरूस्त केले आहे. रात्री 11 वाजेनंतर वीज पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. यानंतर महापालिका व महावितरणच्या पथकाने गस्त घालत पहाणी केली. या पाहणीत पथकाला चिंचोली-उमाळा दरम्यान दोन झाडे बाटलीवाला कारखान्याजवळ मुळासकट वीज तारांवर वादळांमुळे उन्मळलेले दिसले. तसेच व्ही सेक्टर येथे तारा तुटलेल्या दिसल्या. त्यामुळे अनेेकांमध्ये घबराहट झाले होते.
रमजाननिमित्त पाण्याचे वाटप : शनिवार पासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने महापालिकेला शहरातील वितरण टाक्यापूर्णपणे भरता आलेल्या नाहीत. टाक्यापूर्ण न भरल्याने शहराचा पाणीपुरवठा 1 दिवस उशीराने होणार आहे. महावितरणतर्फे वीज पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू होते. परंतु, त्यांनी जर मंगळवार रात्री 8 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरूळीत झाला तर सोमवार, मंगळवारचा पाणीपुरवठा बुधवारी करण्यात येणार आहे असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. नागरिकांनी वीजपुरवठा खंडीत कालवाधीत नागरिकांनी महापालिकेल्या सहकार्यांबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आहेत. दरम्यान शहरात चार दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याने नगरसेवक कैलास सोनवणे यांनी रमजानचा महिन्याचे औचित्यसाधून इस्लामपुर, भिलपुरा परिसरात 50 हजार लिटरर्स पाण्याचे टँकरद्वारे वाटप केले आहे. रविवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाला होता परंतु पून्हा वीजपुरवठा खंडित झाला होता.
महावितरण अधिकार्यांचा उर्मटपणा
महावितरणकडे महापालिकेने वीज वितरण सुरळीत करण्यासंदर्भांत पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी सुप्रीडंट इंजिनिअर बनसोडे यांना रात्री एसएमएसद्वारे शहरावासीय वीज खंडीत असल्याने दोन दिवसांपासून पाण्यापासून वंचीत असल्याने वाघूर येथील खंडीत वीज त्वरीत चालू करा अशी विनंती केली. अभियंता खडके यांच्या एसएमएसला बनसोडे यांनी सकाळी 6 वाजता महापालिकेने महावितरणचे पेमेंट केले आहे का याची विचारणा एसएमएसद्वारे केली. महापालिका ही मार्च पासून नियमीत बील अदा करीत आहे. तसेच थकबाकीबाबत ओटीएसनुसार बील भरत आहे. महापालिका चालू वीज बील व थकीत बीलाचा ओटीसनुनसार हप्ता नियमीत भरत असतांना महावितरण अधिकार्यांनी असंवेदनशिलता दाखविली आहे. पाणी सारखी आवश्यक सेवा वीज पुरवठ्या अभावी नागरिकांना देता येत नसतांना महावितरणचे अधिकारी उर्मटसारखे वागत असल्याचे दिसून येत आहे. दिड-दोन महिन्यापूर्वी जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीचे कामांमुळे जळगावकरांनी भर उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी भटकंती करावी लागली. त्यात चार दिवसापासून वाघूर रॉ वॉटर पंपिंग स्टेशन व उमाळा जलशुद्धीकरण वीजपुरवठा हा शनिवारी सायं.7.30 पासून खंडित झाला.
सोमवारपासून विद्युतपुरवठा खंडीत
काल सकाळपासूनच उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा खंडत झाला होता. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यसाठी महावितरणाचे तडवी साहेब यांचे पथक व महापालिकेचा पाणी पुरवठा विभागाचे पथक संयुक्तपणे बिघडाचा शोध घेत आहेत. शहरातील सर्व 10 टाक्या रिकाम्या आहेत. सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. पाणी पुरवठा विभाग व महावितरण विगाचे कर्मचारी पाणी पुरवठा सुरुळीत करण्यासाठी कार्यरत होते. जलशुद्धीकरण केंद्राचा शनिवारपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो आजपर्यंत सुरळीत झाला नसल्याने शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झालेला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.