वीज बिलावरील दंडाच्या रकमेत मिळणार सूट

0

भुसावळ । महावितरण कंपनीने थकित वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेत आता कृषी वीज वापरकर्त्या ग्राहकांचाही सहभाग करून घेतला जाणार आहे. यापूर्वी केवळ घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांना या योजनेत सहभाग घेता येणार होता. नवीन बदलाने शेतकर्‍यांना फायदा होईल. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना बिलावरील व्याज आणि दंडाच्या रकमेत सूट मिळणार आहे. महावितरण कंपनीच्या ‘नवप्रकाश’ योजनेत कृषी पंपधारकांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. यापूर्वीच्या काळात वीज बिल भरल्याने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना सहभागी होता येणार आहे.

या योजनेत 31 जानेवारी 2017 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांनी मूळ थकबाकी भरल्यास थकबाकीच्या रकमेवरील व्याज आणि दंडाच्या रकमेत 100 टक्के सूट मिळणार आहे.