शहादा। विजवितरण कंपनीकडून जादा वीज आकारणी, व्याज तसेच मीटर रीडींग यातील चुकांची दुरूस्ती आदि तक्रारींचे निवारण करण्यासाठी येथील वीज वितरण कंपनीच्या प्रकाशा रस्त्यांवरील उपकेंद्रात जनता दरबार घेण्यात आला. 24 तास विजपुरवठा होण्यासाठी तालुक्यात गावठान फीटर योजनां राबविण्यात येणार आहे. वीज ग्राहकांपर्यत वीज कंपनी योजनांची माहिती अपडेट पोहचविण्यासाठी एसएमएस सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयात द्यावा असे आवाहन मंडळ अधिकारी आर. एम. चव्हाण यांनी या जनता दरबारात केले.
तालुक्यातील 17 गावांच्या विद्युतीकरणाला मंजूरी
शहादा तालुकात सर्व गावांचे विद्युतीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 87 पैकी 17 गावांना मंजुरी दिली आहे. तसेच सिंगल फेज योजनां बंद करून तालुकात 24 तास विजपुरवठा होण्यासाठी गावठान फीटर योजनां राबविण्यात येईल अशी माहिती चव्हाण यांनी या वेळी दिली. या वेळी डॉ कांतीलाल टाटीया, अनिल भामरे. संतोष गांगुर्डे. रवींद्र बुनकर बाबुलाल ईशी व वीज ग्राहकांनी तक्रारीं मांडल्या. प्रास्ताविक धनंजय भामरे यांनी केले. या वेळी शिवाजी पाटील, के.डी.पाटील. ओंकार अहिराव, दिपक खैरनार व ग्राहक उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुलाब सोनवणे यांनी केले.
अव्वाचे सव्वा बिल दिल्याची तक्रार
त्यात गणेश पवार यांनी 2014 मध्ये वीज मिटर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी अर्ज दिला होता. मीटरचा वापर नसतांना बील देण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली असता मंडळ अधिक्षक अभियंता चव्हाण यांनी ग्राहकांने दिलेल्या अर्जाच्या तारखेपासून दिलेले बील रद्द करण्याचे आदेश दिल्याने पवार याचे समाधान झाले. निहाल पठाण या तक्रार दाराला दोन वर्षापुर्वी एक महिन्याचे बील दोन लाख 67 हजार रू. दिले होते. त्याबाबत त्यांनी लेखी तक्रार दिली. मीटर रीडींग दोन हजार 364 असतांना अवाच्या सवा बिल देण्यात आले. त्यातच विजवितरण कंपनी ने न्यायालयामार्फत पठाण यांना नोटीस दिली. न्यायालयाने 25 ते 30 हजार रू भरण्याचे आदेश दिले. जनता दरबारात दिलेल्या तक्रारीं नंतरही तोडगा न निघाल्याने त्यांचे समाधान झाले नाही.
ग्राहकांनी मांडल्या समस्या
यावेळी वीज कंपनी चे मंडळ अधिकारी अभियंता आर. एम. चव्हाण, कार्यकारी अभियंता धनंजय भामरे, डाँ.कांतीलाल टाटीया भाजपाचे तालुका अध्यक्श डॉ.किशोर पाटील, राष्टवादिचे जिल्हा उपाध्यक्श अनिल भामरे शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख धनंजय पाटील अतुल जयस्वाल, जितेंद्र जमदाळे आदि उपस्थित होते. या जनता दरबाराला ग्राहकांनी चांगला प्रतीसाद दिला. ग्राहकांनी अनेक तक्रारीं मांडल्या.