शहादा । शहादा येथिल वृंदावननगरमधिल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरूपोर्णिमानिमित्त गुरूपुजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यात स्वामी समर्थांचे गुरूपुजनास असंख्य भाविकांनी सहभाग नोंदविला.गुरूपौर्णिमा दोन दिवस असल्याने गुरूपिठ दिंडोरी येथिल कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रांत शनिवारीच गुरू पोर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला.शहादा येथिल वृंदावननगरमधील स्वामी समर्थ केंद्रात सकाळी 5.30 वाजता स्वामी समर्थांच्या मुर्तीची षोडशोपचार पुजा करण्यात आली.
सामूहिक स्वामीचरीत्र वाचन
आठ वाजेच्या आरतीनंतर स्वामी समर्थ गुरूंचे जोडीने पुजन करून सामुहीक स्वामी चरीत्र वाचन करण्यात आले.यात शंभर ते दिडशे सेवेकरींनी सहभाग नोंदविला. 10.30 च्या नैवद्य आरती नंतर प्रसाद वाटप करण्यात आला.या केंद्रात पोर्णिमेचे औचित्य साधुन सामुहिक गुरू चरीत्र वाचन केले.कार्यक्रम शांततेत व यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख भरत पाटील,गोरख चौधरी,अरविंद पाटील, नंदलाल निझरे व सेवेकरी वर्गाने परीश्रम घेतले.