जळगाव। महानगर पालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी नगरसेवक नितीन बरडे, संदेश भोईटे, पृथ्वीराज सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, प्रभाग समिती क्र. 1 अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, प्रभाग समिती क्र.2 अधिकारी उदय पाटील, प्रभाग समिती क्र. 3चे साळुंखे, प्रभाग समिती क्र. 4चे नेमाडे उपस्थित होते.
विद्युततारांबाबत खात्री करुन घ्यावी….
या बैठकीत प्रशासनातर्फे आलेले 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच कार्यात्तर 16 प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. 2 प्रस्ताव पुन्हा सादर झाली तर आयत्यावेळचे 13 विषय मंजूर करण्यात आले. बैठकीत नागरिकांनी तसेच संस्थांनी वृक्षरोपण करतांना तेथे विद्युत तारा आहेत किंवा नाही याची खात्री करूनच वृक्षारोपण करण्याची सूचना मांडण्यात आली. वृक्षलागवड करतांना त्या त्या प्रभाग समिती कार्यालयाकडून जागा निश्चित करून घ्यावी. जे वृक्ष विद्युततारांना अडथळा ठरत आहेत ते तोडतांना महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळासोबत बैठक घेवून पूर्वतयारी करून वृक्षतोडणीची परवानगी देण्याचे ठरविण्यात आले आहे.