नवापूर। तालुक्यात वृक्षलागवडीचे उदिष्ट साध्यकरण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी निमा आरोरा यांनी केले. त्या राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडी संकल्प संदर्भात सूरपसिंग नाईक नगर भवनात आयोजित नियोजन बैठकीचा वेळी केले.
निमा अरोरा यांच्या अध्यक्षस्थानी तलाठी ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, शासकीय अधिकारी व कर्मचारी, समाजीक संघटना, पत्रकार यांची बैठक घेण्यात आली. अरोरा पुढे म्हणाल्या की शासना तर्फे वृक्ष व खड्डे तयार मिळतील परंतु त्यांना जगविणे व वाढविण्याचे काम मात्र जनतेचे आहे. काळाची गरज लक्षात घेता सर्वानी चांगल्या कामांसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. नंदूरबार विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी गणेश रणदिवे यांनी या बाबत आधिक माहीती देताना सांगितले की वन विभाग महसूल विभाग व पंचायत समिती मार्फत नवापूर तालुक्यात 43 हजार वृक्ष लागवडीचे उदिष्ठ आहे. त्या अनुषंगाने 31 ग्रामपंचायतीची हरीत सेना म्हणून निवड करण्यात आली आहे.