वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्याचा संकल्प

0

नवापुर । तालुक्यातील वडकळंबी व उकाळापाणी येथे मानव विकास कार्यक्रमातर्गत 10 हजार बांबु रोपाची मंजुर सामुदायीक वनहक्कात लागवड करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा 4 कोटी वृक्ष कार्यक्रम यशस्वी करण्याचा संकल्प ग्रामसभेने केला. वृक्ष लावून ते जतन करुन पेसा अंतर्गत त्यांचा फायदा ग्रामसभेला येणार्‍या काळात मिळणार आहे.यावेळी याकार्यक्रमाचे उद्घाटन पं.स सभापती सविता गावीत यांचा हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात वृक्ष लागवडीप्रसंगी माजी जि.प बांधकाम सभापती एम.एस.गावीत,सरपंच उर्मीला गावीत,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,वनक्षेञुाल प्रथमेश हाडपे,उकाळापाणीचे सरपंच काळुराम गावीत, खानापुर सरपंच सुनिल गावीत,विनायक गावीत, सुरेश गावीत, धिरसिंग गावीत,रविंद्र गावीत,हरीष गावीत,अनिल गावीत, राजेश गावीत, कंसु गावीत,विस्तार अधिकारी किरण गावीत,तालुका पेसा समन्वयक विजय ठानकर,वनपाल ए.एन.जाधव आदी उपस्थित होते.

जंगलामधुन मिळणारे गौण वनौषधी
सर्व मान्यवरांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी माजी जि.प बांधकाम सभापती एम.एस.गावीत म्हणाले की,आदिवासीचा विकास करायचा असेल तर पेसा कायदाची प्रभावी अमंलबजावनी करुन जंगलाचे सवर्धन केले पाहीजे.ग्रामसभेने तशी जबाबदारी घेतली पाहीजे.जंगलामधुन मिळणारे गौण वनोषधी हे आपल्या गावासाठी आपण जमा करुन आपल्या कुंटुबाना गावातच हंगामी रोजगार मिळु शकतो.गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर म्हणाले की,पेसा अंतर्गत जंगालात वृक्ष लागवड करणे व त्यांचे संवर्धन करणे व त्यापासुन उत्पन मिळविण्याचे अधिकार आपल्या ग्रामसभेला आहेत.सुत्रसंचलन ग्रामसेवक दिलीप खोब्रागडे यांनी, आभार विजय ठानकर यांनी मानले.