धुळे : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात वेळोवेळी शासनाला निवेदने देण्यात आलेली आहेत. मात्र अद्याप शासनाने या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात अध्यक्ष विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष चंद्रकांत जैन, कार्याध्यक्ष शिरीष जैन, सचिव महेबूब पठाण, कोशाध्यक्ष वसंत वाणी, राजीव पाटील, संदीप सोनजे, हरी पवार, सुनील पाटणकर, बालाजी पवार, गोरख भिलारे, विकास सूर्यवंशी, रघुनाथ कांबळे, संजय पावसे, गोपाळ चौधरी, रवींद्र कुलकर्णी आदी सहभागी झाले होते. स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने जुलै 2017 मध्ये कामगार मंत्री संभाजी पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. त्या वेळी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत आश्वासन देण्यात आलेले होते.