वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीला पडले 95 टक्के

0

चिंचवड गावातील रुचिता रमेश बेंडखळे हिचे यश

चिंचवड : चिंचवड विभागातील वृत्तपत्र विक्रेते रमेश बेंडखळे यांची मुलगी रुचिता हिने दहावीच्या परिक्षेत 94.40 टक्के मिळविले. ती श्रीधरनगरातील माटे हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. मी अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले होते. शाळेतील शिक्षकांनी व घरातील सर्वांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार मी अभ्यास केला. अभ्यास व सराव खूप झाल्यामुळे परीक्षेचा ताण आला नाही. इंग्रजी, गणित, शास्त्र हे तीन विषय आवडीचे आहेत. दररोज मी चार तास अभ्यास करत होते.

आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार
तिला चालू वर्षी आदर्श विद्यार्थिनी म्हणून शाळेकडून पुरस्कारही मिळाला आहे. वडील वृत्तपत्र वाटपासह असून इलेक्ट्रिशियनचेही काम करतात. आई टेल्को गृहिणीमध्ये इलेक्ट्रिशियन आहे. लहानपणांपासून रुचिता हुशार तिला खो-खो खेळाची आवड आहे.