वृत्तवाहिनी कर्मचार्‍याची आत्महत्या

0

मुंबई । आयबीएन-लोकमत या मराठी वृत्तवाहिनीमध्ये साऊंड इंजिनिअर असलेल्या नितीन शिर्के या कर्मचार्‍याने रविवारी रात्री परळ रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असल्याची माहिती तपासात उघडकीस झाली आहे. शिर्केचे त्याच्याच वाहिनीतील एका महिलेवर प्रेम होते. परंतु, त्या महिलेने प्रेमाच्या नावाखाली माझी फसवणूक केली असून माझ्या मृत्यूला ती महिला व अन्य दोन जण जबाबदार आहेत, अशी पोस्ट शिर्के यांनी सोशल मीडियावर अपलोड केली. रात्री दहाच्या सुमारास पोस्ट अपलोड केली असून परळमधूनच आत्म्हत्येपूर्वी आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट टाकली होती. दरम्यान, याप्रकरणी शिर्केचे कुटुंबीय तसेच सुसाईड नोटमध्ये नमूद सुवर्णा जोशी, प्रसाद मेस्त्री आणि मनोज गडनीस यांचे जवाब नोंदविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुसाईड पोस्टमध्ये म्हटले…
माझ्या मृत्यूला सुवर्णा वसंत जोशी आणि प्रसाद मेस्त्री हेच जबाबदार आहेत. सुवर्णा ही गेल्या तीन वर्षापासून तिचे माझ्यावर प्रेम आहे, असे सांगत होती. मात्र, हे साफ खोटे होते. तिचे मनोज गडनीसवर प्रेम होते आणि आता प्रसादशी. आता ती माझ्याशी खोटे बोलत आहे. कृपया अशा लोकांना शिक्षा करा.